माझे उपक्रम आणि नवोपक्रम

new

विज्ञान, तंत्रज्ञान आणि Helping Hands

शाळेच्या वेळेनंतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला गती देण्यासाठी गावातील उच्च शिक्षित स्वयंसेवकांना (Helping Hands) सोबत जोडून घेतले आहे. त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना Arduino, Robotics आणि IT चे मार्गदर्शन केले जाते. दरवर्षी शाळा स्तरावर ‘Gramo-Sci’ विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. तंत्रज्ञानाची जोड म्हणून विद्यार्थ्यांसोबत मिळून आम्ही ‘krushimitra’ या नाविन्यपूर्ण वेबसाईट मॉडेलची निर्मिती देखील केली आहे.

whatsapp image 2026 07 15 at 3.30.18 pm

ज्ञानरचनावाद (ABL) आणि आनंददायी शिक्षण

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्ग अध्यापनात मी ‘ज्ञानरचनावाद’ (Activity Based Learning) पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करते. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा उत्साह टिकून राहावा यासाठी ‘दप्तरमुक्त आनंददायी शनिवार’ निमित्त विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी ऑरोविक्स, तसेच ‘आर्ट ऑफ लिविंग’च्या सहाय्याने उत्कर्ष योगा व मेधा योगा सत्रांचे नियमित आयोजन केले जाते.

screenshot 2026 07 15 174201

वाचन प्रेरणा आणि समृद्धी

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली जातात. मी स्वतः स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी दैनिक सकाळचे ‘NIE’ (News in Education) साप्ताहिक आणि इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘Kids Age’ मासिक उपलब्ध करून दिले आहे. तसेच दैनिक हितवादचे ‘Twinkle Star’ हे मुलांचे विशेषांक दर आठवड्यात वाचनासाठी वर्गात ठेवले जाते.

इतर प्रमुख नवोपक्रम

डिजिटल स्कूल

२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे, आणि ग्रामीण भागातील माझे विद्यार्थी यात कुठेही मागे राहू नयेत, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांना तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडले जाते. ‘Helping Hands’ या आमच्या स्वयंसेवक उपक्रमाच्या मदतीने आम्ही विद्यार्थ्यांना Arduino, Robotics आणि IT (माहिती तंत्रज्ञान) चे प्राथमिक धडे देतो.

याच आधुनिक शिक्षणाचा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून, आमच्या विद्यार्थ्यांनी मिळून ‘krushimitra’ (कृषीमित्र) या नाविन्यपूर्ण वेबसाईट मॉडेलची यशस्वी निर्मिती केली आहे. ‘डिजिटल स्कूल’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्याच्या प्रगत जगासाठी तयार करणे, हेच माझे उद्दिष्ट आहे

ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच ‘ई-कचरा’ (E-Waste) ही आजच्या काळातील एक मोठी पर्यावरणीय समस्या बनत आहे. पर्यावरण रक्षणाची सवय लहान वयातच विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावी, यासाठी मी शाळेत ‘ई-कचरा जागरूकता उपक्रम’ राबवला आहे.

खराब झालेले मोबाईल, बॅटरी, जुन्या वायर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठेही न फेकता, त्यांची योग्य विल्हेवाट कशी लावावी, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाते. या मोहिमेला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यासाठी आम्ही शाळेमध्ये ‘E-Waste Dustbin’ ची स्वतंत्र स्थापना केली आहे. यामुळे विद्यार्थी आणि गावकऱ्यांना आपला ई-कचरा सुरक्षितपणे एकाच ठिकाणी जमा करण्याची शिस्त लागली आहे

ऐतिहासिक व सांस्कृतिक जाणीव

विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास हा केवळ शाळेच्या चार भिंतींत होत नाही, तर बाहेरचे जग प्रत्यक्ष अनुभवल्याने होतो. विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी आम्ही ‘वस्तू संग्रहालयाची अभ्यासी भेट’ आयोजित केली होती, जिथे विद्यार्थ्यांनी जुन्या ऐतिहासिक वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या.

तसेच, मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत म्हणून, सन २०२४-२५ मध्ये भंडारा येथे आयोजित ‘राज्यस्तरीय नाट्योत्सव स्पर्धा’ पाहण्यासाठी मी विद्यार्थ्यांना विशेष सहलीवर नेले होते. यासोबतच, ‘चला करून घेऊया ओळख मराठी महिन्यातील तिथींची’ यांसारख्या रोजच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना आपल्या भाषेची आणि सांस्कृतिक मुळांची ओळख करून देण्याचे काम मी सातत्याने करत आहे.