मनात एकदा आशेचा किरण निर्माण झाला की, अशक्य असे काहीच नसते..
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गावसूत, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर
नमस्कार, मी सौ. वसुंधरा गजानन धोटे. मी एक विज्ञान पदवीधर शिक्षिका असून माझे शिक्षण एम.एस्सी. आणि एम.एड. झाले आहे
विज्ञान व तंत्रज्ञान प्रसार
Gramo-Sci' विज्ञान प्रदर्शन, E-Waste जागरूकता आणि रोबोटिक्स (Robotics) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे..
कृतीतून शिक्षण (ABL)
ज्ञानरचनावाद (Activity Based Learning) आणि 'दप्तरमुक्त आनंददायी शनिवार' यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके व उदाहरणांद्वारे सोप्या भाषेत शिक्षण देणे..
वाचन प्रेरणा व सर्वांगीण विकास
'Helping Hands' उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी 'NIE', 'Kids Age' सारख्या साप्ताहिकांचे वाचन
विज्ञान पदवीधर शिक्षिका (M.Sc., M.Ed.)
जि. प. उ. प्रा. शाळा गावसूत
उपक्रमशील शिक्षिका
नमस्कार! मी वसुंधरा धोटे, आणि या शैक्षणिक वेबसाईटवर आपले स्वागत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे आणि ग्रामीण भागातील मुलांना सोप्या भाषेत शिक्षण देणे, हेच माझे मुख्य ध्येय आहे.
“एकदा तुम्ही आशेची निवड केली की, काहीही शक्य होते…” या विचारावर माझा ठाम विश्वास आहे. ज्ञानरचनावाद (ABL) आणि कृतीयुक्त शिक्षणातून मी माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा नेहमी प्रयत्न करते.
या वेबसाईटच्या माध्यमातून मी माझे विविध शैक्षणिक उपक्रम, विज्ञान प्रयोग आणि विद्यार्थ्यांच्या यशाच्या कथा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे.
